*कोकण Express*
*दलाली मोडीत काढली म्हणून कृषी कायद्याला विरोध ; माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे*
*कॉग्रेसने दलालांना आंदोलनात जुंपले
ठाकरे यांचे कोकणाशी वाकडे ; उद्धव ठाकरेंवर टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्रधानमंत्री मोदी यांनी देश महासत्ता बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शेतकरी,सबळ बनविले पाहिजे, कष्ट करी समृद्ध झाला पाहिजे यासाठी विध्येयके आणली.७०वर्षाचे कायदे मोडित काढले आणि शेकऱ्यांला जास्त पैसे मिळेल तेथे शेतमाल विकावे असा कायदा आणला.मात्र मोदींविरोधात राजकीय आंदोलने केली जात आहेत.राहुल गांधींनाला शेतीतील काय कळते.त्यांनी शेती केली आहे काय कधी ?दलाली मोडीत काढली म्हणून कॉग्रेसने दलालनाना कामाला लावले.अशी टीका माजी मुख्यमंत्री ,खासदार नारायण राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे ना शेतीतील काय कळते . या ठाकरेंचे कोकणाशी वाकडे आहे.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हे ठाकरे दौरा कराचे.शेतकऱ्यांना पैसे देणार होते आता मुख्यमंत्री झाल्यावर किती दिले. फक्त फसवणूक केली.काँग्रेस मध्ये राष्ट्रवादीत कोण आहे जनतेचे काम करणारा भाजपा एकच पक्ष आहे तो समाजकार्य करतो.
राज्यात हे ठेकेदाराचे सरकार आहे.पालकमंत्री एक ठेका घेतात आणि चार ठेकेदार जोडता.आज चौपदरी करणाचे काम सिंधुदुर्ग मध्ये फास्ट झाले रत्नागिरीत आजून अर्धवट आहे.कारण हे ठेकेडसरी साठी भांडतात.अशी टीका केली.
एका दिवसात परवानगी चिपी विमानतळासाठी आणतो, आधी त्या विमानतळावर जाणार रस्ता करा, पाण्याची ,लाईटची व्यवस्था करा. केंद्रात सत्ता आमची आहे तुमचा काय संबध या विमानळाशी असा सवाल यावेळी खासदार राणे यांनी केला.
देशमहासत्ता करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आणि भाजपच्या पाठीशी असेच कायम राहा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.
असले ओवाळून टाकलेले आम्हाला नको
जे भाजपाला सोडून सेना,काँग्रेस, राष्ट्रवादी गेलेले आहेत ते आता पुन्हा भाजपात घेण्यासाठीवरवींद्र चव्हाण यांना विनंती करता.असले ओवाळून टाकलेले लोक आम्हाला भाजपात नको आशा समाचार घेतला.