*’शासन आपल्या दारी’… उत्तम नियोजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार

*’शासन आपल्या दारी’… उत्तम नियोजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार

*कोकण Express*

*’शासन आपल्या दारी’… उत्तम नियोजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार*

*(सिंधुदुर्ग):-*

मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत कुडाळ येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे विशेष बैठक घेत प्रशासनाचे आभार मानले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही प्रशासनाच्यावतीने पालकमंत्र्यांचे आभार प्रदर्शन केले.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सर्वच विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रितपणे केलेले चोख नियोजनाबदल पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सर्वाचे आभार मानले. ते म्हणाले, लाभार्थ्यांना आणणे त्यांना वेळेत पोहचविणे यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले नियोजन केले होते. कुडाळ प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी त्याचबरोबर पोलीस यंत्रणेने उन्हात चोखपणे आपले कर्तव्य बजावले. अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचे पथक, आरोग्य विभागाचे पथक, नोडल अधिकारी जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या पध्दतीने लाभार्थ्यांना वागणूक देत सेवा देत कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! यापुढेही जनसेवक म्हणून

सर्वजण आपले कर्तव्य करत रहाल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री माहोदयांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे, प्रत्यक्ष बैठक घेवून तसेच कार्यक्रमस्थळी भेट देवून प्रशासनाला

मार्गदर्शन केले. प्रशासनाला ऊर्जा दिली. त्याबरोबर पाठबळ दिल्याचे सांगून, त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी

के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांचे आभार मानले. सर्व विभागांच्या समन्वयाने तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सर्वांनी

• दिलेली जबाबदारी पार पाडली, जिल्हावासियांनीही प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी केल्याचे सांगून

त्यांचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते. तसेच इतर अधीकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!