*कोकण Express*
*कणकवलीत राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज कणकवली पटवर्धन चौक येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष एस. टी.सावंत यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणा समाज बांधवांनी जोरदार दिल्या.यावेळी लाडू,पेढे,जिलेबी वाटप नागरिकांना करण्यात आले.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस एस. एल.सपकाळ,उपाध्यक्ष लवू वारंग ,तालुकाध्यक्ष सुशील सावंत ,जिल्हा संघटक अनुप वारंग, आर. जी. सावंत, अविनाश राणे,कणकवली शहराध्यक्ष औदुंबर राणे,राजेंद्र राणे, सोनू सावंत, सोमा गायकवाड, भूषण राणे,निलेश रावराणे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.