कणकवली येथे एस. टी कर्मचाऱ्यांचा सत्कार*

कणकवली येथे एस. टी कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*कोकण Express*

*कणकवली येथे एस. टी कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ऊन, वारा, पाऊस, वादळे, नैसर्गिक आपत्ती याची कोणतीही तमा न बाळगता एस.टी महामंडळ आणि त्यांचे कर्मचारी गेली 75 वर्षे जनतेची अविरत सेवा करीत आहेत. खेड्यात तसेच दुर्गम ठिकाणी तळागाळातील सर्वच स्तरातील लोकांना सुखरूप त्यांचे निर्गमनाचे ठिकाणी पोहोच करीत आहेत. यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कणकवली येथील एसटी नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रक, ड्राइव्हर, कंडक्टर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी चालक एम. एस पवार व चालक डी. जी. साबे, वाहक एम. एस बैग तसेच वाहतूक नियंत्रक बी. जी चव्हाण, बोभाटे, डी. आर. चव्हाण यांचे स्वागत ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग चे जिल्हा संघटक दादा कुडतरकर व ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग शाखा कणकवली अध्यक्ष नामदेव जाधव यांनी केले तसेच आभार व्यक्त करून शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!