मोदीच्या लाटेसमोर अस्तित्व टिकविण्यासाठी कृषी कायद्याला विरोध; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

*कोकण Express*

*मोदीच्या लाटेसमोर अस्तित्व टिकविण्यासाठी कृषी कायद्याला विरोध; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील*

*देशात मोदींना पाठींबा आहे हे आजच्या समर्थनार्थ मोर्चातून दाखवून दिले*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देशातील भाजपा विरोधकांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे.मोदींच्या करिष्म्यापुढे २०२४ च्या निवडणुकांत किती जागा निवडून येतील याची खात्री आता काँग्रेस सह सर्वच विरोधकांना राहिलेली नाही.त्यामुळे ते शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध करत आहेत. मोदी सरकारने आणलेले कृषि कायदे हे शेतकर्‍यांच्या जीवनात श्रीमंती आणणारे कायदे आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला दर मिळण्याची हमी या कायद्यामुळे मिळणार आहे. पण देशातील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोनल करत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

येथील भाजप कार्यालयासमोर कृषि विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपची जाहीर सभा झाली. यात चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच कृषि कायद्याचेही समर्थन केले. ते म्हणाले, मोदींनी आणलेल्या कृषि कायद्याला शेतकरी नव्हे तर व्यापारी विरोध करत आहेत. व्यापार्‍यांना सगळा कृषि माल बाजार समितीमध्येच आणायचा आहे. जेणे करून दलालांचाच फायदा होईल. रूमालाखाली दर ठरेल आणि शेतकर्‍यांच्या हातात तुटपुंजी रक्कम येईल.
श्री.पाटील म्हणाले, विरोधक अफवा पसरत आहेत.

कृषि समिती बाहेर माल विकला तर शेतकर्‍यांची फसवणूक होईल असे सांगत आहेत. पण मी पण शेतकर्‍याचा मुलगा आहे. आमची अडीच एकर शेती आहे. आम्हाला वेडे समजू नका. तुम्ही आतमध्ये काटा मारता. आम्ही बाजार समिती बाहेर बसून माल विकू आमचा इलेक्ट्रॉनिक काटा लावू आणि फसवणूक होऊ देणार नाही. ते म्हणाले, मोदी सरकारने वर्षाला शेतकर्‍यांना ६ हजार रूपये मिळण्याची तरतूद केली. तसेच शेतमजूरांना ३ हजार रूपये पेन्शनची व्यवस्था केली. शेतकर्‍यांच्या या प्रेमामुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये भरभरून साथ दिली आहे. त्यापेक्षाही अधिक ताकद २०२४ मध्ये दिसेल. म्हणूनच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मोदींना सतत विरोध करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!