*कोकण Express*
*शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत..*
*खांबाळे केंद्र शाळा नं.1 येथील सोलर हायमास्टचे उद्घाटन जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामूळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीने जिल्हा नियोजन मधून अपारंपारिक उर्जा या योजनेतुन खांबाळे केंद्र शाळा नं.1 येथे सोलर हायमास्ट बसविणे या कामासाठी 4 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्या कामाचे उद्घाटन खांबाळे गावातील जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला. सोलरहायमास्ट मुळे विजेची बचत होणार आहे. गावात अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे हायमास्ट बसविण्यात येतील असे लोके यांनी सांगितले. हायमास्ट केंद्रशाळेतील परिसर झळाळून निघाला आहे. सदरचे काम झाल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.*
*यावेळी उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, माजी उपसरपंच लहू साळुंखे,अशोक पवार, रामदास पवार, सुनिल पवार, माजी सरपंच विठोबा सुतार,प्रमोद लोके,गुरुनाथ गुरव, प्रभाकर पवार,शांताराम पावार, रामचंद्र गुरव,वासुदेव साळुंखे,बाळा गुरव, दीपक महादेव पवार,दीपक वसंत पवार, प्रसाद कदम, ग्रामपंचायत सदस्या रसिका पवार, मंगेश कांबळे, सुनिल गुरव, दिनेश पालकर, प्रविण पालकर, अभिषेक सावंत, धनंजय कदम,अनंत गुरव, अरुण पवार, संतोष पवार, अशोक निग्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.