*कोकण Express*
*जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवार संस्थेच्या वतीने तळेरे येथील श्रीदेव गांगेश्वर मंदिर परिसरात वड आणि चाफ्याच्या झाडाचे वृक्षारोपण*
*कासार्डे : संजय भोसले*
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने तळेरे येथील श्रीदेव गांगेश्वर मंदिर परिसरातील देवराईमध्ये वड आणि चाफ्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच सीड बॅंकेमध्ये विविध प्रकारच्या बिया स्विकारुन त्याचे संकलन सुरू करण्यात आले.
निसर्ग मित्र परिवार ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन आणि संगोपन याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा संकल्प करून तळेरे येथील श्री गांगेश्वर मंदिर देवराई परिसर विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध करण्याचे निश्चित करण्यात आला आहे.या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेची विशेष सभा देखील आयोजित करण्यात आली होती.यासभेमध्ये संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
संस्थेचे सचिव राजेश जाधव यांनी सुरुवातीला प्रास्ताविक करतांना सांगितले की, यावर्षी पासून संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सीड बॅंकेची व सीड बाॅलची संकल्पना स्पष्ट केली तसेच वृक्षारोपण व संगोपन करण्याच्या कार्यात संस्थेचे सभासद,शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या संस्थेमार्फत सीड बॅंकेची संकल्पना स्पष्ट करुन विविध प्रकारच्या फळ बीया जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद लाभला असून अनेकांनी त्या बीया संस्थेकडे सुपूर्द केल्या त्याचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.तसेच वडाच्या रोपाचे वृक्षारोपण संस्थेच्या सभासद आणि श्रावणी कॉम्प्युटरच्या संचालिका सौ.श्रावणी मदभावे, कुमारी नांदलस्कर व भार्गवी खानविलकर यांच्या हस्ते तर चाफ्याच्या झाडाचे वृक्षारोपण माजी सरपंच चंद्रकांत तळेकर व संस्थेचे माजी अध्यक्ष दादा महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर,निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष- संजय खानविलकर, सचिव- राजेश जाधव, सल्लागार- शशांक तळेकर, दादा महाडिक, चंद्रकांत तळेकर, सदस्य प्रविण वरुणकर, सतीश मदभावे,सौ.श्रावणी मदभावे, भरत चव्हाण, डॉ.अभिजीत कणसे, प्रमोद कोयंडे, निकेत पावसकर, दिपक नांदलस्कर, दळवी महाविद्यालयाचे प्रा.प्रशांत हटकर आदी उपस्थित होते.