*कोकण Express*
*करियर निवडताना विद्यार्थ्यांची क्षमता, त्याची अभिरूची, योग्यता पाहाणे आवश्यक ; श्री. दत्ता केसरकर*
*”दहावीनंतर पुढे काय?’ – गुरुकुल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सध्या शैक्षणिक क्षेत्रात असंख्य रोजगार, नौकरीभिमुख शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. मात्र आज विद्यार्थी व पालकांना दहावीनंतर पुढे कोणते करियर निवडावे, हा प्रश्न सतावत आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठीच गुरुकुल अकॅडमी कणकवली येथे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
पालकांनी आपल्या पाल्याला नेमके कशात करियर करायचे आहे हे समजून घेतले पाहिजे. करियर निवडताना विद्यार्थ्यांची
क्षमता, त्याची अभिरूची, योग्यता पाहाणे आवश्यक आहे. तर कोणतेही महाविद्यालय निवडताना त्याचा दर्जा पहावा. असे
आवाहन संचालक श्री. दत्ता केसरकर यांनी केले.
सोबत दहावीनंतर उपलब्ध शाखा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, विशिष्ठ प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा व प्रवेश प्रक्रिया अशा विविध महत्वपूर्ण विषयांवर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. यावेळी सहशिक्षक विशाल कासले, विज्ञान विभाग प्रमुख मुकुद चिकोडी, वैदीक गणित प्रशिक्षक रुपाली कदम, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.