*कोकण Express*
*उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा*
*सिंधुदुर्गनगरी, दि. 3*
उद्योग मंत्री उदय सामंत हे दि. 4 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*
रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 7.12 वाजता कोंकण कन्या एक्सप्रेसने कुडाळ रेल्वे स्थानक जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण. सकाळी 7.30 वाजता एम.आय.डी.सी विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता शासन आपल्या दारी योजना नियोजन आढावा बैठक. स्थळ:- पंचायत समिती सभागृह, कुडाळ जि.सिंधुदुर्ग. सकाळी 11 वाजता शासन आपल्या दारी नियोजनासंदर्भात जागेची पाहणी स्थळ:- कुडाळ हायस्कूल,कुडाळ जि.सिंधुदुर्ग दुपारी सोईनुसार एम.आय.डी.सी विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव सायंकाळी. सोईनुसार कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण.