न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

*कोकण Express*

*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम*

*एस. एस. सी. चा निकाल 98.42 टक्के, 127 पैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेत आपल्या न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत प्रशालेच्या प्रविष्ठ झालेल्या 127 विद्याथ्यांपैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल 98.42 टक्के लागला असून आपल्या प्रशालेच्या माध्यमिक विभागाचा निकाल पुढील प्रमाणे आहे. प्रविष्ठ उत्तीर्ण निकाल

127 विद्याथ्र्यांपैकी 125 विद्यार्थी पास झाले. शाळेचा निकाल 98.42 टक्के लागला.

प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे

1. पारस चंद्रकांत आचरेकर 485 / 500 97 टक्के

1. कु. जान्हवी संजय पवार 482 / 500 96.40 टक्के

2. सर्वेश रजनिकांत आडिवरेकर 473 /500 94.60

सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्तरावरून अभिनंदन होत आहे.

फोंडाघाट न्यु इंग्लिश स्कुलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन केले आहे आणि भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकांनाही अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!