*कोकण Express*
*कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी लोहार जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये शुभांगी विलास लोहार (तृतीय वर्ष,बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला
सदर स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण 25 विद्यार्थी सहभागी झाले होते. सावंतवाडी शाखेच्या वसतिगृहातर्फे तिने सदर स्पर्धेत भाग घेतला होता.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती . के. मंजुलक्ष्मी, यांच्या शुभहस्ते हस्ते परेड मैदान, ओरोस, सिंधुदुर्ग येथे सदर पारितोषिक वितरण समारंभात तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तिच्या या यशाबद्दल बॅ.नाथ पै फाजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला,डॉ. प्रगती शेटकर,डॉ शरावती शेट्टी, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे