कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.७० टक्के

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.७० टक्के

*कोकण Express*

*कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.७० टक्के*

*पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर कुडाळ तालुक्यात प्रथम*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल यावर्षी ९७.७० टक्के लागला असून पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर (९८.८० टक्के) गुणांसह तालुक्यात प्रथम आला आहे. तर द्वितीय क्रमांक कुडाळ हायस्कुलची राधिका तेरसे (२८.२० टक्के) आणि वरद माईनकर (२८.२० टक्के), तृतीय क्रमांक पाट हायस्कुलचा आदित्य नाईक (९७.८० टक्के) यानी मिळविला. कुडाळ तालुक्यातून १ हजार ७४५ पैकी १ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तालुक्यातील २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून ७८४ विद्यार्थी विशेष श्रेणी ६२४ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर २४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झालेत.

कुडाळ हायस्कूल कुडाळचा निकाल ९६.२४ टक्के

कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीतील २१३ पैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल (९६.२४ टक्के) लागला. या परीक्षेत प्रथम क्रमांक राधिका तेरसे (१८.२० टक्के) आणि वरद माईनकर (९८.२० टक्के), द्वितीय क्र. अन्वय पाटकर (९७ टक्के) तृतीय युतिका पालव (९६.८० टक्के ) यानी मिळविला. या प्रशालेचे ९० टक्केच्या वरील २३ विद्यार्थी असून संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० मिळवणारे ७ विद्यार्थी आहेत.

पणदूर हायस्कूलचा निकाल १०० टक्के निकाल

शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा या प्रशालेतून १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व १५६ उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १०० लागला. शाळेत प्रथम क्रमांक कृष्णकांत अटकेकर (९८.८० टक्के), व्दितीय पियुषा सावंत (९७ टक्के), तृतीय सेजल सुर्वे (९५ टक्के) असे गुण मिळविले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!