*कोकण Express*
*दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणाचीच बाजी.…!*
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागलाय. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर निकालात ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. दुपारी १ वाजता ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. कोकण विभागाने नेहमीप्रमाणे आपली प्रथम येण्याची परंपरा कायम राखलीय.