*कोकण Express*
*सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मालाड शाखेच्या वतीने सेमिनार संपन्न*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सोमवार दिनांक २९/५/२०२३ रोजी संगम सलून मालाड येथे ठेवण्यात आलेला सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मालाड शाखेच्या वतीने वर्कशॉप सेमिनार जेन्ट्स कटिंग व लेडीज कटिंग साठी इंटरनॅशनल ट्रेन डिप्लोमा होल्डर हेअर स्टायलिस्ट मा.श्री सचिन जी टक्के तसेच मा.श्री प्रसाद जी चव्हाण त्यांनी बॉलीवूड मेक आर्टिस्ट मार्गदर्शन बिजनेस टिप्स डेमोस्टेशन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. श्री निलेशजी रणदिवे मालाड शाखा अध्यक्ष श्री चंद्रशेखर धोंडू सावंत कार्याध्यक्ष श्री रवीलाल चौहान उपाध्यक्ष अध्यक्ष श्री अमित मोहिते सेक्रेटरी श्री महेंद्र चव्हाण खजिनदार श्री गणेश वाघ सल्लागार श्री राजेंद्र गायकवाड कांदिवली क्रांतीनगर विभाग अध्यक्ष श्री रामा श्रेय शर्मा सलून व्यवसायिक चालक-मालक कारागीर कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.