अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी

*कोकण Express*

*अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी*

*ठाकरे सरकारने शेतकर्‍यांना एक रूपयाचीही मदत नाही केली* 

*भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप*

*कणकवली ः प्रतिनिधी*पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मच्छीमारांनाही शेतकर्‍यांचा दर्जा दिला. किसान क्रेडिट कार्डचाही लाभ त्यांना मिळवून दिला. एवढंच नव्हे तर शेतकर्‍यांच्या खात्यात थेट पैसे देऊन कोरोना संकटातही ते शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे राहिले. पण कृषि विधेयकाच्या माध्यमातून मोंदींना बदनाम करण्याची खेळी कॉग्रेस पक्ष करत आहे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉग्रेस पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आज किसान मोर्चा नंतर झालेल्या सभेत केला.

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली. पण राज्यातील ठाकरे सरकारने शेतकर्‍यांना एक रूपयाचीही मदत केलेली नाही असाही आरोप श्री.बोंडे यांनी केला. दरम्यान जुन्या कायद्यामुळे शेतकर्‍यांचे भले होणार नाही, म्हणून मोदीजींनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांच्या भल्यासाठी नवीन कायदे आणले. शेतकर्‍यांना देशभरात कुठेही माल विकता यावा यासाठी नवीन कायदे आणले. शेतकरी देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. त्यातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. तसंच कृषि विधेयक लागू झाल्यानंतर देशातील एकही कृषि उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाही. एकाही शेतकर्‍याची जमीन गहाण राहणार नाही. ती कंपन्यांना विकता येणार नाही अशीही तरतूद असल्याचे श्री.बोंडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!