*कोकण Express*
*ठाकरे गटाला आ. नितेश राणेंनी दिला धक्का..*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मजूर संस्थेचे संचालक आत्माराम बालम भाजपात; आ. नितेश राणेंनी केले पक्षात स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मजूर संस्थेचे संचालक आत्माराम बालम भाजपात प्रवेश केला आहे. आ. नितेश राणेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत केले आहे. या प्रवेशाने ठाकरे गटाला आ. नितेश राणेंनी धक्का दिला आहे.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश झाला. यावेळी बँक संचालक विठ्ठल देसाई, शशी राणे, प्रणाली माने, मिलिंद माने आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.