*कोकण Express*
*किल्ला ग्रामस्थांसाठी धावले मनसेचे पाणीदूत*
*देवगड ःःप्रतिनिधी*
देवगड जामसंडे शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता आज दिनांक २७ मे २०२३ रोजी देवगड किल्ला ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म.न.चि.से.राज्य चिटणीस श्री संतोषजी शिंगाडे तसेच देवगड संपर्क अध्यक्ष विमोल मयेकर यांच्या माध्यमातून मोफत पाणी वाटप करण्यात आले यावेळी मा.सहसंपर्क अध्यक्ष संतोष मयेकर,मा. तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उप तालुकाध्यक्ष महेश नलावडे महाराष्ट्र सैनिक बबलू परब विद्यार्थी संघटनेचे धिरज वाडेकर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर प्रसंगी देवगड किल्ला ग्रामस्थांनी देवगड शहरातील पाणी टंचाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरेंच्या पाणीदुत महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले..