*कोकण Express*
*आ. राणेंच्या उपस्थितीत दत्ता सामंत यांचा वाढदिवस साजरा*
आ. नितेश राणेंच्या हस्ते दत्ता सामंत यांना नियुक्तीपत्र प्रदान
*मालवण ः प्रतिनिधी*
भाजपा नेते दत्ता सामंत यांचा वाढदिवस गुरुवारी रात्री आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घुमडे येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून श्री. सामंत यांची निवड करण्यात आल्याबद्दल आ. राणे यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.