*कोकण Express*
*संजय ताम्हणकर यांचे अपघाती निधन*
*कासार्डे ; संजय भोसले*
साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील संजय वामन ताम्हणकर यांचे बुधवारी दूर्दैवी अपघाती निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी साळिस्ते येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय ताम्हणकर हे नाधवडे येथे झाडे तोडण्याचे काम करत होते. त्यावेळी झाडावरून पडून त्यांचे दूर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने साळिस्ते गावावर शोककळा पसरली. एक साधा, सज्जन माणूस म्हणुन संजय यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडिल, भाऊ, बहीण असा मोठ्ठा परिवार आहे. निवृत्त पोस्टमन वामन ताम्हणकर यांचा तो मुलगा होता.