*कोकण Express*
*कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल*
*कला शाखेतून दीक्षिता लाड तर वाणिज्य शाखेतून अमित तर्फे आणि विज्ञान शाखेतून स्वरांगी जठार प्रथम*
*कासार्डे ; संजय भोसले*
कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2023 चा निकाल गुरुवारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. त्यामध्ये विद्यालयातील कला शाखेतून दीक्षिता लाड तर वाणिज्य शाखेतून अमित तर्फे तर विज्ञान शाखेतून स्वरांगी जठार प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यालयातील कला शाखेतून अनुक्रमे प्रथम तिन क्रमांक असे : दीक्षिता लाड (76.83%), मालिनी लाड (67.67%), सुरज दळवी (64.33),
वाणिज्य शाखेतून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक असे : अमित तर्फे (84.33%), सुश्मिता ठूकरुल (84.17%), विशाखा राणे (78.50%)
तर विज्ञान शाखेतून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक असे : स्वरांगी जठार (72%), नेहा काळे (71.83%), चैत्राली कुडतरकर (71.33%) या सर्व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था कमिटीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था कमिटी पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक,विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.