*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत सानिका सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार*
*कणकवली/ प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी आजोबा सत्यवान राणे, आई रश्मी सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अजय गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.