ग्रा. पं. च्या विहिरीवरील पंप, केबल, दोरी चोरल्याप्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल

ग्रा. पं. च्या विहिरीवरील पंप, केबल, दोरी चोरल्याप्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल

*कोकण Express*

*ग्रा. पं. च्या विहिरीवरील पंप, केबल, दोरी चोरल्याप्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल*

*डामरे प्रभारी ग्रामसेवक संजय तांबे यांनी दिली पोलिसात फिर्याद*

*17 हजार 280 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी*

शासकीय विहिरीवर बसवलेला पंप, केबल व दोरी चोरल्या प्रकरणी डामरे मधील चार जणांच्या विरोधात ग्रामसेवकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक संजय तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कणकवली तालुक्यातील डामरे गावामध्ये गट नंबर 936 मध्ये सरकारी योजनेतून बांधलेल्या विहिरी वर नळ योजना करण्यासाठी विद्युत पंप बसवणे व नळ योजनेची पाईप लाईन करणे याकरिता श्रीधर कानडे यांनी 2010 मध्ये ग्रामपंचायत डामरे ला संमती पत्र दिले होते. सध्या उन्हाळ्यामुळे डामरे कानडेवाडी येथे सदर विहिरीवर 12 मे रोजी 1 एचपी चा विद्युत पंप बसविण्यात आला. व या विद्युत पंपाला चंद्रकांत कानडे यांच्या विद्युत मीटर मधून वीज पुरवठा घेण्यात आला. 19 मे रोजी डामरे गावचे सरपंच किरण कानडे यांनी सदर विहिरी वरील पंप, केबल व दोरी चोरीला गेल्याचे सांगितले. 23 मे रोजी सरपंच किरण कानडे, उपसरपंच सागर साटम यांनी जागेवर जाऊन खात्री केली असता सदर विहिरीवर जोडलेला ओपनवेल पंप, केबल, व दोरी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची पंचयादी 23 मे रोजी करण्यात आली. या विहिरीच्या बाजूच्या घरातील गणेश कानडे यांनी सदर विहिरीवरील पंप, केबल व दोरी आमच्या वाडीतील संतोष नरहरी कानडे, शैलेश नारायण कानडे, स्वप्निल सुभाष कानडे, रघुनाथ सहदेव कानडे यांनी 19 मे रोजी सकाळी 8.30 वाजता काढल्याचे सरपंच किरण कानडे यांना फोन द्वारे सांगितले.असे ग्रामसेवक संजय तांबे यांनी या फिर्यादीत म्हटले आहे. या चोरीला गेलेल्या मुद्देमाला मध्ये 10 हजार 800 रुपये किमतीचा 1 एचपी चा लक्ष्मी कंपनीचा पंप, 6300 रुपयांची 75 मीटर लांबीची केबल व 180 रुपयाची दोरी असा मिळून एकूण 17 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद संजय तांबे यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. यानुसार वरील चार जणांच्या विरोधात कणकवली पोलिसात 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फोंडाघाट दूर क्षेत्राचे श्री. वंजारे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!