*कोकण Express*
*आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने मंडळ अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल अर्पिता ठाकूर यांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कळसुली तलाठीपदी कार्यरत असलेल्या आशिये गावच्या स्नुषा सौ. अर्पिता अजित ठाकूर उर्फ सरिता रामचंद्र बावलेकर यांची खारेपाटण मंडळ अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या गावातील अधिकारी होत असल्याने विकासात सहकार्य मिळेल, असा विश्वास सरपंच महेश गुरव यांनी व्यक्त कैला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, सौ. मानसी बाणे, अविराज मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गुरव, ग्रामसेवक राकेश गोवळकर माजी सरपंच सदानंद बाणे शंकर गुरव, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, अनिल गुरव, सत्यवान गुरव, सुसिता ठाकूर, शिक्षक निलेश ठाकूर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.