*कोकण Express*
*शिक्षणमंत्र्यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे केले वाटोळे*
*संजू परब यांचा आरोप झिरंगवाडी रस्ता न झाल्यास केसरकरांचा फोटो उभारून फोटोला हार घालणार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मतदारसंघासह शहराच देखील वाटोळं केलं. आठवडा बाजार आपल्या हेकेखोर स्वभावानं हलवला आहे, त्यांचे हाल जनतेला भोगावे लागत आहेत असा टोला हाणत झिरंगवाडी येथील रस्ता झाला नाही तर दीपक केसरकर यांचा त्याठिकाणी फोटो उभारून फोटोला हार घालणार असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.
मतदारसंघाच वाटोळं केल्यानंतर सावंतवाडी शहराच वाटोळं करण्याच काम मंत्री दीपक केसरकर यांनी हाती घेतलं आहे. याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आठवडा बाजार आहे. हेकेखोर स्वभावानं हा बाजार त्यांनी हलवला आहे. याचे भोग जनतेला भोगावे लागत आहेत. या बाजाराच्या ठिकाणी पार्किंग, टॉयलेटची व्यवस्था नाही. त्यामुळे उघड्यावर लघुशंका करताना विक्रेते दिसतात. यातून सौंदर्याला बाधा येत नाही का ? पावसाळ्यात शाळा सुरु झाल्यावर या ठिकाणच्या शाळांच्या मुलं व पालकांची ये-जा असते. त्यांनी हानी पोहोचल्यास याची पूर्ण जबाबदारी दीपक केसरकर व मुख्याधिकारी यांची राहिल. येथील झाड देखील जुनाट झालीत. झाड कोसळून कुणी मुत्यूमुखी ठरल्यास त्याचीही जबाबदारी केसरकर यांची राहणार आहे. अन्यथा त्यांनी जसा होता तसा बाजार तलावाकाठी पूर्ववत करावा, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर हा बाजार आम्ही पुर्ववत करू असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले. तर प्रशासक दीपक केसरकर सांगितील तसे वागत आहे झिरंगवाडी ७ नं. शाळेकडील रस्ताच नाही आहे. ही काम सोडून बाजार उठवायच काम ते करत आहेत. एकदिवस जनताच यांचा बाजार उठवेल. तर हा रस्ता तो पूर्ण नाही झाला तर दीपक केसरकर यांचा त्याठिकाणी फोटो उभारून त्याला हार घालणार असल्याचा इशारा संजू परब यांनी दिला.
दरम्यान, मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे दीपक केसरकर यांच्या दहशतीखाली आहेत असे उत्तर त्यांनी दिलं. म्हणूनच त्यांची बदली करण्यात आली. केसरकर यांचा दबाव होता. बाजार न हलविल्यान केसरकरांनी त्यांची बदली केली. बाजार हलविल्यान लोकांचे हाल होत आहेत. हा बाजार ठराव करून घेतला होता. आता ठराव न करता हा बाजार हलविण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे. हॉकर्स संघटनेचे आश्चर्य वाटत. या जागेला कसा काय होकार दिला. की हॉकर्स संघटना दीपक केसरकर यांना मॅनेज झाली ? असा सवाल त्यांनी केला. याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, युवा शहराध्यक्ष संदेश टेमकर आदि उपस्थित होते.