आ. नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या युगपुरुष महाराणा प्रतापसिंह कलादालनचा दुसरा वर्धापनदिन थाटात संपन्न

*कोकण Express

*आ. नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या युगपुरुष महाराणा प्रतापसिंह कलादालनचा दुसरा वर्धापनदिन थाटात संपन्न..*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

येथे साकारलेल्या युगपुरुष महाराणा प्रतापसिंह कलादालन या वास्तूचा दुसरा वर्धापनदिन थाटात संपन्न झाला. आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिले कलादालन या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. या कलादालनला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, पं. स. सदस्य अरविंद रावराणे, सौ. हर्षदा हरायान, सरचिटणीस बाळा हरयान, सौ. भारती रावराणे, राजेंद्र राणे, सौ. प्राची तावडे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, नगरसेवक संताजी रावराणे, बंड्या मांजरेकर, किशोर दळवी, प्रकाश शेलार, समाधान जाधव, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख आशिष रावराणे, वैभव कोकाटे, तसेच रावराणे समाजाचे सर्व जेष्ठ मंडळी व हितचिंतक आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!