*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान…*
*के.मंजुलक्ष्मी; पत्रकार दिन,जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण संपन्न…*
*सिंधुदुर्गनगरी ता.०६:*
वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेवून जिल्ह्यातील पत्रकार समाज परिवर्तनाचे काम करीत आहेत.तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथे केले.पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन सोहळा व पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम ओरोस फाटा येथील श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली व जिप अध्यक्षा समिधा नाईक यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी जिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर,जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,ज्येष्ठ विधितज्ञ अजित भणगे,जिप सदस्य अंकुश जाधव,पंस सदस्या सुप्रिया वालावलकर,सरपंच प्रिती देसाई,जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,उपाध्यक्ष बाळ खडपकर,जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे,अण्णा केसरकर,माधवराव कदम,संतोष वायंगणकर, उमेश तोरसकर,संतोष सावंत,पत्रकारांचे गुणवंत विद्यार्थी तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकार उपस्थित होते.
यावेळी ५ वी व ८ वी मध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या,तसेच १० वी १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या मुलांचा स्कूल बॅग,सन्मानपत्र व पुष्पुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
माधवराव कदम यांनी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले आहे.याची पहिली प्रत २००० मध्ये प्रकाशित करण्यात आली होती.तर आज दुसऱ्या आवृत्ती पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे (सिंधुदुर्गनगरी), ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार महादेव परांजपे (आरोंदा), कै. अरविंद शिरसाट स्मृती पुरस्कार तेजस देसाई (दोडामार्ग), उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दीपेश परब (वेंगुर्ले), उत्कृष्ट छायाचित्रकार अनिकेत उचले (कणकवली), ग्रामीण पत्रकार दिनेश साटम (देवगड) यांना मिळाले असून आज त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व पुषपगुच्छ देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचा गौरव करण्यात आला.
तरेळे येथील मंडळाने पोंभूर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाची स्वच्छता केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यानीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक सचिव उमेश तोरसकर यानी केले.सूत्रसंचालन दत्तप्रसाद वालावलकर,तर आभार सहसचिव देवयानी वरसकर यानी केले.