*कोकण Express*
*खासदार विनायक राऊत यांनी घेतले खांबेश्वर देवाचे दर्शन : ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार*
*कासार्डे ; संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील साळिस्तेचे ग्रामदैवत श्री. देव खांबेश्वर देवाचे दर्शन खासदार विनायक राऊत यांनी घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सतिश सावंत, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
श्री देव खांबेश्वर देवालयाचा जिर्णोध्दार होण्यापुर्वी मन्दिराकडे जाणार्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करन्यासाठी खासदार निधीमधुन 10 लाखाचा तातडीने निधी देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरुही झाले. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे सुलभ झाले.
जिर्णोध्दार उत्सवादरम्यान खासदार विनायक राऊत यांनी मंदिराला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी साळिस्ते ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबई, साळिस्ते ग्रामस्थ देवस्थान कमिटी यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विविध साळिस्ते ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबई, साळिस्ते ग्रामस्थ देवस्थान कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.