*कोकण Express*
*वडिलांनीच मुलाच्या डोक्यात मारला हातोडा ; मुलाचा जागीच मृत्यू*
*तळेरे ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कासार्डे आयरेवाडी येथे हदय हेलावणारी घटना घडली असून वडील व मुलगा यांच्यात घरगुती भांंडणातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होत वडिलांनी मुलांच्या डोक्यात हातोडा व दंडुका मारल्याने यात मुलांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी मध्यरात्री २:०० सुमारास घडली. घटनेची माहिती सकाळी वडीलांनी शेजा-यांना दिल्यानंतर पोलीस पाटील यांना खबर मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.वडीलांना पोलीस कस्टडीत घेत अटक करण्यात आली.
कासार्डे आयरेवाडी येथिल •िाकाजी राघो आयरे, वय ७०, व मुलगा पांडुरंग उर्फ रविंद्र •िाकाजी आयरे, वय ३८ दोन्ही रा. कासार्डे (आयरेवाडी) हे आपल्या घरात स्वंतत्रपणे दोन कुटुंब करून राहत होते. दरम्यान मयत पांडुरंग उर्फ रविंद्र आपल्या पत्नी व मुलीसह वास्तव्य करीत होते. दरम्यान गेली काही दिवस वडील व मुलांमध्ये मुलगा दारू पिऊन येत असल्याने घरगुती •ाांडणे सुरू होती. मंगळवारी सकाळी पत्नी मुलीसह फणसगाव येथे माहेरी गेली असताना घरात वडील •िाकाजी आयरे घरात होते याचदरम्यान मुलगा रात्री दारु पिऊन घरी आल्यावर बंद दरवाजावर लाथ मारल्यावर दरवाजा उघडला यानंतर वडीलांशी •ाांडण्यास सुरवात केली.
या •ाांडणाचे रूपांतर वादावादीत होत मुलांने वडीलांच्या पायांवर दांडा मारला यानंतर वडीलांशी हुज्जत घातली जोरजोरात •ाांडायला सुरवात केली. रोजच्या •ाांडणाला कंटाळलेल्या वडीलांनी प्रथम दांडा डोक्यावर मारत मुलाला अंगणात खाली पाडले. यानंतर वडीलांचे •ाान हरल्याने त्यानी आपला मुलगा असल्याचे •ाान न ठेवता संयम सुटलेल्या वडीलांनी दंडुक्याने छातीवर ठेचून मारल्यावर हातात मिळलेला हातोडा डोक्यावर मारत जबर मारहाण केली या मारहाणीत मुलाचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना बुधवारी मध्यरात्री २.०० च्या दरम्यान घडली. दरम्यान मयत पांडुरंग उर्फ रविंद्र यांच्या डोक्याला व मानेखाली जबर मार लागल्याचे निदर्शनास येत होते.
यानतंर आपल्या मुलाचा मुत्यू झाल्याची माहिती वडील •िाकाजी यानी सर्व हकीकत शेजाºयांना सांगितली. शेजाºयांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. यानतंर पोलीस पाटीलांना घटनेची माहिती स्थानिक व कणकवली पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर तातडीने पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. यानतंर पोलीसांनी पंचनामा करत हत्येत वापरण्यात आलेल्या साहित्य ताब्यात घेतले.यावेळी घटनास्थळी श्वान शोधक पथक, फॉरेन्सिक लॅबचे टीमही दाखल होत शोधकार्य केले.दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,उपनिरीक्षक डॉ.रोहीणी सोळंके,खंडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात,डीवायएसपी चंद्रकांत लाड,कासार्डे पोलीस हवालदार नितीन खाडे, माने, पार्सेकर,पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान या थरकाप उडवणा-या घटनेमुळे युवा पिढी मद्याच्या आहारी जात असल्याने अशा घटना वाढत असून आज पोटच्या पोराला अशाप्रकारे मारल्याने वडीलही हताश झालेले दिसून आले. वडीलांना कणकवली पोलीस स्टेशनध्ये अटक करून रवानगी करण्यात आली. या घटनेनंतर कासार्डे दशक्रोशित एकच खळबळ उडाली आहे.