*कोकण Express*
*कर्नाटकातील विजयाचा कणकवलीत जल्लोष*
*कणकवली तालुका कॉंग्रेसने केली फटाक्यांची आतिबाची*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा धक्का बसला असून कॉंग्रेस कर्नाटकमध्ये स्पष्टपणे बहुमत मिळून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर याच्या नेतृत्वाखाली कणकवलीत पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कॉंग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाचा आनंदोत्सव कणकवली साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुका
अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह युवासेनेचे राजू राठोड, प्रदीपकुमार जाधव, महेश तेली, अजय मोर्चे, राजू वर्णे, निलेश मालडकर, निसार
शेख, आदी उपस्थित होते.