*कोकण Express*
*कर्नाटकचा विजयोत्सव सावंतवाडीत काँग्रेसने केला साजरा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कर्नाटकामध्ये भाजपचा दारुण पराभव करीत कॉंग्रेसने विजय संपादन केल्याचा आनंदोत्सव सावंतवाडी काँग्रेसने छत्रपती शिवाजी पुतळा उभा बाजार तसेच शहरात इतर ठीक ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करून साजरा केला.
यावेळी जेष्ठ कॉंग्रेस नेते राजू मसुरकर, युवा नेते समीर वंजारी व सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.