*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून उद्या महिलांना “द केरला स्टोरी” सिनेमा पाहता येणार..!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सद्या देशामध्ये घडत असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांवर आधारीत बहुचर्चीत “द केरला स्टोरी” हा सिनेमा वास्तवदर्शी असून प्रत्येक महिला पालकांना पाहता येणार आहे. हा सिनेमा पाहणे अत्यंत जरूरीचे आहे.
यासाठी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यानी रविवार दिनांक १४/५/२०२३ रोजी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे दुपारी १२.३० वाजताचा होणारा शो खास महिलांसाठी मोफत दाखविण्याची व्यवस्था केली आहे. जास्तीत जास्त महिला
प्रेक्षकांनी सदरहू चित्रपट पहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.