*कोकण Express*
*पत्रकार दिनाच्या निमित्ताने देवगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण*
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे 6 डिसेंबर पत्रकार दिनाच्या निमित्ताने देवगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देवगड तालुका पत्रकार संघ सचीव स्वप्नील लोके, उपाध्यक्ष दयानंद मांगले, कोषाध्यक्ष दिनेश साटम,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद लोके,सदस्य संतोष साळसकर,विश्वास मुणगेकर उपस्थित होते.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त दिनेश साटम यांचे अभिनंदन माजी आमदार व भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कोरोनाच्या संक्रमण पार्श्वभूमीवर यावर्षी अत्यंत साधपणाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.