*कोकण Express*
*सिंधुगर्जना चषक २०२३ स्पर्धा उत्साहात संपन्न*
*सिंधुगर्जना ढोलताशा पथक फक्त वादनातच नाही तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर – तहसीलदार मा.आर. जे. पवार साहेबांचे गौरवोद्गार*
*सिंधुगर्जना चषक २०२३ चा मानकरी ठरला गुरुकृपा ग्लॅडिएटर्स संघ*
सालाबाद प्रमाणे यंदा देखील एन.बी. एस.चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथक कणकवली आयोजित सिंधुगर्जना चषक २०२३ स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी करण्यात आले होते या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला होता
या स्पर्धेत सर्व खेळाडू हे सिंधुगर्जना पथकातील वादक होते यामध्ये मुलींचा देखील प्रत्येक संघात समावेश होता, आर आर रॉयल्स संघमालक सौ.राजश्री रावराणे, पुणे वॉरियर्स चे संघमालक ऋषिकेश भिसे आणि विकास गावडे व तुषार म्हापसेकर गुरुकृपा संघमालक शुभम पवार, कनकस्टार संघमालक कल्पेश महाडेश्वर, शिवस्वराज्य संघमालक सौ.स्नेहा महाडिक, सौरभ महाडीक, बर्निंग फायर संघमालक सिद्धेश्वर करंबेळकर यांचे संघ होते आय पी एल प्रमाणेच लिलाव प्रक्रियेने सर्व पथकातील खेळाडूंची निवड या संघांमध्ये करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन ॲड.उमेश सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सावंत साहेबांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या वादन कलेबद्दल कौतुक देखील केले या दरम्यान १० सामने खेळविण्यात आले.सिंधुगर्जना चषक २०२३ चा अंतिम सामना गुरुकृपा ग्लॅडिएटर्स विरुद्ध कनकस्टार या संघांमध्ये रंगला यामध्ये शुभम पवार यांच्या गुरुकृपा ग्लॅडिएटर्स संघाने पथक प्रमुख नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिंधुगर्जना चषक २०२३ वर आपले नाव कोरले व कल्पेश महाडेश्वर यांचा कणकस्टार संघ उपविजेता ठरला १० रंगतदार सामन्यातून गुरुकृपा ग्लॅडिएटर्स संघ सरस ठरला प्रज्ञेश निग्रे याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर मुलांमध्ये उत्कृष्ट फलंदाज धनंजय सावंत व उत्कृष्ट गोलंदाज नितीन चव्हाण मुलींमध्ये उत्कृष्ट फलंदाज हुमेरा मन्सुरी उत्कृष्ट गोलंदाज रिदा मन्सुरी यांना गौरविण्यात आले सिंधुगर्जना चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमूख अतिथी कणकवली चे तहसीलदार मा. आर जे. पवार साहेब उपस्थित होते त्यांनी सिंधुगर्जना ढोल ताशा पथकातील सर्व वादकांचे कौतुक केले व सिंधुगर्जना ढोलपथक फक्त वादनातच नव्हे तर सामाजिक शैक्षणिक, आरोग्य,क्रीडा,या सर्व क्षेत्रात अग्रेसर असते याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.यावेळी सिंधुगर्जना पथकाच्या अध्यक्षा सौ. सुरेखा भिसे, प्रा. हरीभाऊ भिसे, पथकाचे व एन.बी.एस. चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, ॲड.पियूष पांडे,आर आर रॉयल्स संघमालक सौ.राजश्री रावराणे,पुणे वॉरियर्स संघमालक ऋषिकेश भिसे आणि विकास गावडे, संघव्यवस्थापक तुषार म्हापसेकर,गुरुकृपा संघमालक शुभम पवार, कनकस्टार संघमालक कल्पेश महाडेश्वर, शिवस्वराज्य संघमालक सौ.स्नेहा महाडिक, सौरभ महाडीक, बर्निंग फायर संघमालक सिद्धेश्वर करंबेळकर, श्री.गणेश काटकर सर, श्री.जोगेश राणे, रवींद्र विचारे,पथक प्रमुख नितीन चव्हाण, पथक उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे,पथक महिलाप्रमुख रीदा मन्सुरी, उपमहीलाप्रमुख नेहा चव्हाण, पथकाचे सर्व पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेचे पंच म्हणून रोहीत म्हापसेकर, वैभव म्हापसेकर, हिमांशू खडपकर, योगेश पेटकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.. यावेळी सिंधुगर्जनाच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धा ब्राह्मणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानात खेळविण्यात आल्या होत्या.