कळसुली येथे 13 मे पासून श्री स्वामी समर्थ मुर्ती स्थापना, कलशारोहण सोहळा

कळसुली येथे 13 मे पासून श्री स्वामी समर्थ मुर्ती स्थापना, कलशारोहण सोहळा

*कोकण Express*

*कळसुली येथे 13 मे पासून श्री स्वामी समर्थ मुर्ती स्थापना, कलशारोहण सोहळा..*

*विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

प्रेमदया प्रतिष्ठान (मुंबई) व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (हर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली हर्डी येथे श्री स्वार्मी समर्थ महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये 13 ते 15 मे या कालावधीत श्री स्वामींची मुर्ती स्थापना, कलशारोहण आणि पादुका पूजन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
13 मे रोजी सायं. 4 ते 6.30 या वेळेत श्री स्वामी समर्थ पालखी दिंडी सोहळा, 7 ते 8 यावेळेत हरीपाठ पठन व प्रवचन, रात्री 8 ते 9.30 कीर्तन, रात्री 10 ते 12 महिला दशावतार नाटक ‘विधीलेख’. 14 मे रोजी सकाळी 7 वा. गणपती पूण्याहवाचन 9 वा. देवता स्थापना, 10 ते 12.30 अग्नीस्थापना, गृहयज्ञ मुख्य हवन व धार्मिक कार्यक्रम, दु. 1 वा. महाप्रसाद सायं. 3 ते 5.30 स्थानिक परिसरातील भजने, 6 ते 7.30 हरिपाठ पठन व प्रवचन, 7.30 ते 9 कीर्तन, रात्री 9.30 वा. दशावतारी नाटक ‘प्रयागतिर्थ’. 15 मे रोजी सकाळी 7 वा. देवता पूजन, 7.30 वा. कलशारोहण, 11.30 ते 12.30 मुर्ती मुहुर्त प्राण प्रतिष्ठापना, पादुका स्थापना 1 वा. महाप्रसाद सायं. भजने, हरीपाठ व कीर्तन, 7 ते 8 संगीत रजनी कार्यक्रम, 8.30 ते 10 महिलांचा फुगडी कार्यक्रम, रात्रौ 10 वा. डबलबारी बुवा विनोद चव्हाण-सुशील गोठणकर. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मठ, कळसुलीचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!