*कोकण Express*
*35 हजारांची लाच घेताना वनविभाग कार्यालयातील कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
एसीबी च्या पथकाने कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयात धाड टाकून 35 हजारांची लाच घेताना वनमजुराला रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदराने दिलेल्या तक्रारीनुसार एसीबी ने सापळा रचून ही कारवाई आज सायंकाळी केली. दरम्यान रंगेहाथ पकडलेल्या वनमजुराला एसीबी ने कुडाळ येथे नेले असून कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयातील अजून काही मोठे कर्मचारि अधिकारी एसीबी च्या रडारवर असल्याचे समजते.