सिंधुदुर्गातील “रेड सॉईल स्टोरीज”चे प्रदर्शन मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात

सिंधुदुर्गातील “रेड सॉईल स्टोरीज”चे प्रदर्शन मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात

*कोकण Express*

*सिंधुदुर्गातील “रेड सॉईल स्टोरीज”चे प्रदर्शन मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात…*

पूजा आणि शिरीष गवस हे युट्युबर “रेड सॉईल स्टोरीज” नावाने आपल्या स्टोरीज गेले वर्षभर युट्युबवर प्रसारित करत आहेत . कोकणातील निसर्गरम्य परिसर , रूढी, परंपरा , सण यासह महत्त्वाचे म्हणजे येथील खाद्य संस्कृती जगासमोर नेण्याचं काम हे दांपत्य करत आहे . युट्युब वर अत्यंत लोकप्रिय झालेल्या रेड सोईल स्टोरीजचे( Red Soil Stories) अनेक भाग दहा लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहेत . नुकताच रेड स्टोरीजला एक बहुमान प्राप्त झाला आहे .महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या वस्तू संग्रहालयामध्ये म्हणजेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ( पूर्वीचे Prince of Wales ) मध्ये पूजा आणि शिरीष यांच्या रेड सॉईल स्टोरीजचे एपिसोड एका विशेष प्रदर्शनामध्ये दाखवले जात आहेत.
“Savoring Connection”असे ह्या प्रदर्शनाचे नाव असून ‘अन्न ‘ या एका घटकापासून माणसे एकत्र कशी येतात याचा आढावा घेण्यात आला आहे. अन्नामध्ये विविध लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाची निवड आणि मांडणी केली आहे. अन्न या माध्यमातून आपण एखादा सण, उत्सव साजरा करतो , तसेच अन्न हे राजकीय , सामाजिक अन्यायाचे प्रतीक म्हणूनही समोर येते.
जगण्यासाठी वापरात येणारे पुराणकाळातील अन्न ते आजच्या काळातील अन्न असा प्रवास येथे उलगडण्यात आला आहे.
पूजा आणि शिरीष यांनी नुकतीच या वस्तु संग्रहालयाला भेट दिली आणि आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, ” अशा प्रकारे आपल्या कामाची नोंद घेऊन, एका प्रतिष्ठित वस्तू संग्रहालया मध्ये ते दाखवलं जाण ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे पूजा मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असताना याच वस्तू संग्रहालयात काही काळ ती अभ्यासासाठी जात असे . याच ठिकाणी आपली कलाकृती प्रदर्शित होते याचा खूप अभिमान असल्याचं ती बोलली . महाराष्ट्र शासन आणि या वस्तू संग्रहालयाचे क्युरेटर तसेच हे प्रदर्शन ज्यांनी भरविले या विद्यार्थ्यांचे आम्ही खूप आभार मानतो असे त्यांनी सांगितले . हे प्रदर्शन सर्वांसाठी 31 मे पर्यंत खुले राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!