आमदारकी लढवा अथवा खासदारकी, शिवसैनिक हैराण करून सोडतील.

आमदारकी लढवा अथवा खासदारकी, शिवसैनिक हैराण करून सोडतील.

*कोकण Express*

*आमदारकी लढवा अथवा खासदारकी, शिवसैनिक हैराण करून सोडतील…..*

*रूपेश राऊळ, दारोदारी फिरतोय असं सांगून केसरकरांकडून मतदारांचा अपमान…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात मंत्री केसरकर आता बोलणार नाही आणि यापुढे ते बोलले तर ते आमदारकी लढवा अथवा खासदारकी शिवसैनिक त्यांना हैराण करून सोडतील, असा इशारा आज येथे पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. तीन पिढ्याची श्रीमंती असताना जिल्ह्याच्या विकासासाठी दारोदारी फिरतोय, असे सांगून दीपक केसरकरांनी समस्त मतदारांचा अपमान केला. मतदारसंघातील प्रश्न सोडा, शिक्षण मंत्री असताना डीएड धारकांचे प्रश्न सुद्धा ते सोडू शकले नाही हे दुर्दैव आहे, असे राऊळ म्हणाले.

केसरकर व तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर टीका केली होती या पार्श्वभूमीवर श्री. राऊळ यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार, अशोक परब, प्रशांत बुगडे, आबा सावंत, विनोद ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ यांनी केसरकर यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, जिल्हा विकासाच्या नावावर आपली प्रॉपर्टी वाढविण्याचे काम श्री. केसरकर करत आहे. सद्यस्थितीत त्यांचा आरोंदा किरण पाणी हा दौरा प्रॉपर्टी वाढवण्यासाठी होता. त्याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. तेथील ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी केले आहे. केसरकरांना विकासाचे काही पडले नाही. त्यामुळे ते लोकांची दिशाभूल करत आहे. एकही प्रकल्प यशस्वी करू शकले नाही. उलट ते अधिकाऱ्यांना दोष देत आहे. युती सरकारमध्ये असताना आणि आताच्या सरकारमध्ये नासुद्धा अधिकारी काम करू देत नाही असे सांगून ते आपल्यावर असलेली जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे राजन तेली यांच्य करण्यात आले आहे. जी कामे ते करू शकत नाही ती कामे किमान तेली यांनी करावी ते सुद्धा सत्तेचे घटक आहे, असा टोला लगावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!