*कोकण Express*
*पावशी आंदोलन प्रकरणी सरपंच सौ. वैशाली पावसकर यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
आज मंगळवारी मुंबई गोवा महामार्गावर सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केले आणि या आंदोलनामध्ये घोषणाबाजी करून सर्विस रोड आणि एसटी बस प्रवासी शेड झाली पाहिजे अशा घोषणा दिल्या, गोवा महामार्गावरील पावशी ग्रामपंचायत जवळ सर्विस रोड व एस. टी. बस प्रवासी शेडसाठी महामार्गावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह १२ शिवसैनिकांसह ग्रामस्थांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
कुडाळ पोलिसांनी पावशी येथील सर्विस रोड आणि प्रवाशी शेडच्या मागणीसाठी आंदोलनाच्या दिलेल्या नोटीसनुसार पोलिसांनी आदोलन न करण्याचे पत्र देऊनही महामार्गावर पावशी येथे बेकायदा जमाव करून आंदोलन करून वाहतुकीला अडथळा केल्या प्रकरणी पावशी येथील १२ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत नजिकच्या सर्विस रोड मोकळा करावा व बस शेड बांधण्यास मंजुरी मिळाली यासाठी ९ मे रोजी पावशी ग्रामपंचायतनजिक आंदोलन करणार अशी नोटीस पावशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.. वैशाली सदानंद पावसकर यांनी दिली होती. यानुसार, कुडाळ पोलिसानी नोटीस देऊन ठिय्या आंदोलन न करता अन्य सनदशीर मार्गाचा अवलंब करावा असे कळवले होते. मात्र, तरीही १२ जणांनी कलम १४२ चे उल्लंघन गैरकायदा जमाव करून गोवा ते मुंबई जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण केला. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेत महामार्ग प्रशासन विभाग विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी वैशाली सदानंद पावसकर, मिलिंद अंकुश खोत, सागर भोगटे, महेश पावसकर, निखिता निलेश शेलटे, सर्वेश सतिश भोगटे, प्रथमेश संजय खोत, प्रशांत तुळसकर, प्रसाद शेलटे, गणेश नारायण पावसकर, लक्ष्मीकांत सुदन तेली सर्व राहणार पावशी या १२ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.