*कोकण Express*
*मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी पदभार स्वीकारला…..*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तहसील कार्यालयाचे नूतन तहसीलदार म्हणून वर्षा झालटे यांनी आज पदभार स्वीकारला. नायब तहसिलदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकान्यांनीही त्यांची भेट घेत स्वागत केले.
२००४-०५ या वर्षी सेवेत रुजू झालेल्या वर्षा झालटे यांनी कोकण विभाग रायगड येथून सेवेस सुरवात केली. त्यानंतर शहापूर ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, करमणूक कर अधिकारी मुंबई उपनगर येथे त्या कार्यरत होत्या. २०१३-१४ या वर्षी बढ़ती मिळून त्या एमएमआरडीए व त्यानंतर भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना नागपूर या ठिकाणी कार्यरत होत्या. नुकतीच त्यांची मालवण तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी पदभार स्वीकारला.