*कोकण Express*
*जिल्ह्यात गावागावात गोमय गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्रयत्न करणार..*
*श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग प्रवण फार्मर प्रोडूसर कंपनी वैभववाडी आणि देशी गोपालक उत्पादक संघ सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम…*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात गावागावात गोमय गणेश मूर्ती तयार करणार
श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग प्रवण फार्मर प्रोडूसर कंपनी वैभववाडी आणि देशी गोपालक उत्पादक संघ सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम आज श्री सचिन परब सुकळवाड यांच्या गोशाळेत मूर्तिकार संघांचे अध्यक्ष श्री नारायण (बापू) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली गोमय गणेश मूर्ती सात्विक,पर्यावरण पूरक, वजनाने हलकी आणि देशी गायीचे महत्व अधोरेखित करून गोपालकास आर्थिक उत्पन्न करून देणारी आहे आणि त्यामुळे यावर्षी तालुका स्तरावर गोमय मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन मूर्तिकारांना देखील चांगला फायदा करून देण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी प्रवण कंपनी वैभववाडी आणि सिंधुदुर्ग जिल्हा गोपालक संघांचे अध्यक्ष श्री महेश संसारे संचालक शैलेश सावंत,सचिन परब,मूर्तिकार संघांचे संचालक दत्ताराम सावंत दत्तात्रय मठकर, अरुण पालकर प्रवण चे संचालक मंगेश कदम ceo नितीन मोरे इत्यादी उपस्थित होते.


