*कोकण Express*
*राजभाषा हिंदी प्रचार परीक्षांमध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचे नेत्रदीपक यश*
बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेमार्फत वेगवेगळ्या स्तरावरील वेगवेगळ्या परीक्षांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध परीक्षांमध्ये नेत्र दीपक यश संपादन केले.
प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली हिंदी प्रबोध परीक्षा, इयत्ता दुसरी हिंदी सुबोध परीक्षा, इयत्ता तिसरी हिंदी प्रारंभिक परीक्षा, इयत्ता चौथी हिंदी प्राथमिक परीक्षा, इयत्ता पाचवी हिंदी बोधिनी, इयत्ता सहावी हिंदी उत्तमा, इयत्ता सातवी हिंदी भूषण, इयत्ता आठवी हिंदी विभूषण, तसेच माध्यमिक स्तरावर इयत्ता नववी हिंदी विशारद व इयत्ता दहावी हिंदी रत्न अशा विविध परीक्षा घेण्यात आल्या.
या परीक्षांमध्ये एकूण 240 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तम यश संपादन करत उत्तीर्ण झाले .
या सर्व विद्यार्थ्यांचे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, तसेच सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे व उपमुख्याध्यापिका विभा वझे, विषय शिक्षिका सौ.प्राजक्ता जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्था व प्रशालेच्या वतीने सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या परीक्षांच्या आयोजनासाठी प्रशालेच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ. प्राजक्ता जाधव ,श्रीम.माधवी मालगर व इतर शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, संस्था चालक, पालक व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

