*कणकवली पंचायत समिती सभापती निवड १२ जानेवारी रोजी*
*सभापतीपदासाठी पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांचे नाव चर्चेत**कणकवली ः प्रतिनिधी*कणकवली पंचायत समितीची सभापती निवड १२ जानेवारी रोजी कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून कणकवली तहसीलदार आर. जे. पवार हे काम पाहणार आहेत. सभापतीपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. कणकवली पंचायत समितीमध्ये सर्वच सदस्य हे भाजपाचे असल्याने ही निवड जवळपास बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे. सभापतीपदासाठी पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांचे नाव चर्चेत असून या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र ऐनवेळी नारायण राणेंकडून धक्का तंत्राचा वापरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.