*कोकण Express*
*लक्झरी मधून होणाऱ्या आंबा वाहतुकीवरील आरटीओ ची कारवाई थांबवा!*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी*
*उद्या मंत्रालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन*
देवगड, सिंधुदुर्ग, कुडाळ या भागातील आंबे एक दोन डझनच्या कार्टून बॉक्समध्ये पॅक करून लक्झऱ्यां मधून पुण्यात विक्रीला जातात. लक्झरी मुळे आंब्याच्या बागायतदारांना त्यांचा आंबा पुणे, मुंबईच्या शेतकरी ते ग्राहक थेट सर्विस अगदी माफक दरात देता येते. लक्झरी मध्ये जास्तीत जास्त एकावर एक असे पाच ते सहा बॉक्स चे थर ठेवून आंबा आणला जातो. त्यामुळे आंबा दबला जात नाही आणि आंब्याचं नुकसान पण होत नाही. मात्र लक्झरी मधून होणारी आंबा वाहतूक अडवणूक करण्याचे काम सातारा आरटीओ कडून केले जात असून, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी निर्माण झाली असताना दलालांकडून याबाबत आरटीओला हाताशी धरून कारनामे केले जात असल्याने याबाबत तातडीने आरटीओ ना सूचना द्या व आंबा वाहतूकदारांना दिला जाणारा त्रास थांबवा अशी मागणी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. या बाबत चाचणी उद्या मंत्रालयात श्री. चव्हाण यांनी संबंधित आरटीओंसह बैठक आयोजित केल्याची माहिती श्री काळसेकर यांनी दिली.
कोकणातील टेम्पो ने आंबा पाठवायचा असल्यास एकतर पूर्ण टेम्पो भरून ऑर्डर असावी लागते. आणि टेम्पोत एकावर एक असे 15 ते 20 बॉक्स ठेवले जातात त्यामुळे तळातले बॉक्स त्या भारा मुळे दाबून आंबा खराब होतो. लाकडी पेट्यां मोठ्या असल्यामुळे त्यात कमीत कमी पाच डझनच्या पुढे आंबा असतो . किरकोळ ग्राहकांना एवढ्या आंब्याची गरज नसते. म्हणून एक किंवा दोन डझन चे साधे कार्टूनचे बॉक्स करून आंबा पाठवतात. कोकणातून येणाऱ्या गाड्या साताऱ्याजवळ थांबून त्यातील आंबा जप्त करतात. त्यामुळे गेले दोन- तीन दिवस लक्झरी चालक आंब्याच्या पेट्या घेण्यासाठी नकार देत
आहेत. लक्झरी मधून बाकीच्या कुरिअरचा माल जातो. पण आंबा अडवला जातो.
बदलत्या हवामानामुळे कोकणात आंब्याचे पंचवीस ते तीस टक्के पीक आहे. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यात ह्या नवीन अडचणीची भर पडलेली आहे. याकडे श्री काळसेकर यांनी रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले.