*कोकण Express*
*मळेवाड सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 च्या चौथ्या दिवशीचा शुभारंभ राष्ट्रवादीच्या अर्चना घारे -परब यांच्या हस्ते संपन्न*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळेवाड येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 च्या चौथ्या दिवशीचा शुभारंभ राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा महिलाअध्यक्ष अर्चनाताई घारे यांच्या हस्ते व शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या वतीने जकातनाका येथे पाच दिवसीय भव्य युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाच्या चौथ्या दिवशीचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे यांच्या शुभहस्ते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमावेळी अर्चना घारे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत व मंडळ हे जे कार्य करत आहे त्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.गावाचा विकास करत असताना आपल्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन घारे यांनी दिले.गावातील व्यक्तींनी ज्या क्षेत्रांमध्ये प्रवीण्य मिळवले त्यांचा सत्कार करून मंडळाने व ग्रामपंचायत त्यांना आणखीन स्फूर्ती देण्याचे काम केले असे मत घारे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुपेश राऊळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना या महोत्सवात अनेक पक्षाचे मान्यवर आमंत्रित केलेले असून सर्व समावेशक असा हा महोत्सव असून या महोत्सवाचं हे सहा वर्षे आहे आणि सहा वर्ष सातत्याने कोणताही कार्यक्रम सुरू ठेवणे यातूनच आयोजकांची ताकद दिसून येते.गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अतिशय चांगले काम करत असून ग्रामस्थांनाही त्यांना चांगली साथ देत आहेत.गावाच्या विकासासाठी आपणाला कधीही हाक मारा आपण सदैव तत्पर आहे असे आश्वासन राऊळ यांनी दिले.
यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुंडलिक दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना हेमंत मराठे व त्यांचे सहकारी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करत असूनगावाचा विकास हा प्रगतीपथावर असल्याचे मत व्यक्त केले.गावाच्या विकासासाठी आमची ही मदत आम्ही नक्कीच करू असाही शब्द दळवी यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर हिदायत खान,सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक,अमोल नाईक,मधुकर जाधव,कविता शेगडे,तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,डॉ.गणपत टोपले,पत्रकार निलेश परब,रामचंद्र ऊर्फ बाबल नाईक,प्रकाश राऊत,गुरुप्रसाद नाईक आदी उपस्थित होते.