करिवडे-गवळणीचा वहाळ वळणावरील खडक हटवा

करिवडे-गवळणीचा वहाळ वळणावरील खडक हटवा

*कोकण Express*

*करिवडे-गवळणीचा वहाळ वळणावरील खडक हटवा*

*सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंगेश तळवणेकर यांची  निवेदनाद्वारे मागणी*

*सावंतवाडी दि.०६-:*

सावंतवाडी- बेळगाव रस्त्यावरील कारीवडे गवळणीचा वहाळ येथील कालिका मंदिर एसटी बस गावात जाते, त्या वळणावर भलेमोठे खडक असल्यामुळे गावात जाताना वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे तेथे यापूर्वी बरेच अपघात झालेले आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा काम होत नाही. तरी या ठिकाणी असलेले खडक हटवून रस्त्यावर पांढरे पट्टे मारावेत जेणेकरून वाहनचालक हळू येतील, अशी मागणी जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठ दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन खडक हटविण्याची कार्यवाही पूर्ण करून द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!