विशाल परब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट

विशाल परब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट

*कोकण Express*

*विशाल परब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट*

*वर्षा निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा*

*सिंधुदुर्गात येण्याचे एकनाथ शिंदेना आमंत्रण*

मुंबई:

विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.संतोष सुर्यराव यासह अनेकजण उपस्थित होते.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथे शिवरायांचे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” प्रमाणे भव्य स्मारक व्हावे हि मराठा समाज तसेच शिवप्रेमींची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनामार्फत मांडली.तसेच सिंधुदुर्गातील विविध खेळाडू, क्रिडाप्रेमींसाठी कुडाळ येथे भव्यदिव्य असे क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय सूक्ष्म अवजड मंत्री नारायण राणे यांनी केला होता.तळकोकणातील ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्षभरात पर्यटक येत असतात.यामुळे ह्या जिल्ह्यातील मंजूर झालेला सी- वर्ल्ड प्रकल्प तत्काळ व्हावा अशी मागणी विशाल परब यांनी केली आहे.कोकणातील बोंडू मोठ्या प्रमाणात गोव्यात जातो . ह्या बोंडूवर प्रकियाकरून वाईन निर्माण करणारी वायनरी आरोंदा- शिरोडा सारख्या भागात व्हावी. तसेच यावर्षी आंब्याचे पीक फक्त 20% असल्याने शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडला आहे.यामुळे कोकणातील शेतकरांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी विशाल परब यांनी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घाटमाथ्यावर जाणार ऐकमेव जवळचा मार्ग असलेला आंजिवडा घाट लवकर फोडून झाराप-माणगाव दुकानवाड आंजीवडे पाट गावागावातील कोल्हापूर मार्ग सुरू करण्याची मागणीही विशाल परब यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
त्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन यावर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही सर्व निवेदन वाचून संबंधित विभागांना तात्काळ सुचना दिल्या आहेत.तर लवकरच कोकणचा दौरा करण्याची विनंती विशाल परब यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!