*कोकण Express*
*देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांसह नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार*
*जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांची माहिती*
*देवगड ः प्रतिनिधी*
बारसू रिफायनरी समर्थनार्थ मा. ना. केंद्रियमंत्री तथ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ६ मे रोजी शनिवारी
देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार याच्या नियोजनाची बैठक शुक्रवारी देवगड
आमदार संपर्क कार्यालय देवगड येथे संपन्न झाली.
यावेळी श्री. बाळ खडपे जिल्हा उपाध्यक्ष, श्री. संदीप साटम जि.का. सदस्य श्री. अमोल तेली अध्यक्ष पडेल मंडल, श्री. संतोष किंजवडेकर
अध्यक्ष देवगड मंडल, श्री. शरद ठुकरूल सरचिटणीस देवगड मंडल, श्री. उत्तम बिर्जे युवा मोर्चा अध्यक्ष, श्री. शैलेश लोके गटप्रमुख मिठबांव, श्री. योगेश
चांदोरकर माजी नगराध्यक्ष श्री. सदीप तावडे शक्तीकेंद्र प्रमुख श्री. बाळा गावकर शक्तीकेंद्र प्रमुख देवगड, श्री. दया पाटील, युवा उपाध्यक्ष देवगड, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये देवगड मधून शेतकरी व नागरिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बाळ खडपे जिल्हा उपाध्यक्ष, श्री. संदीप साटम जि. का. सदस्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.