*कोकण Express*
*समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देऊ नये — विश्व हिंदु परिषदेची मागणी*
समलिंगी विवाह दोन समान लिंगांच्या व्यक्ती दरम्यान करण्यात येणारा विवाह आहे. उदा. दोन पुरुषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह. अशा प्रकारचा विवाह हा पूर्णपणे अनैसर्गिक असून त्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता मिळू नये अशा आशयाचे एक निवेदन विश्व हिंदू परिषदेने तयार केले असून त्याची एक प्रत वेंगुर्ला येथील तहसीलदार व पोलीस ठाणे येथे सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषद वेंगुर्ल्याचे मंत्री आप्पा धोंंड,बजरंग दल प्रमुख भूषण पेठे, सत्संग प्रमुख अजित राऊळ,विष्णू खोबरेकर व महादेव तथा भाऊ केरकर दिसत आहेत.