*कोकण Express*
*सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र उर्फ बापू धुरी*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र; बापू धुरी हे आ. रवींद्र फाटक यांचे निकटवर्तीय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र उर्फ बापू धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बापू धुरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत बापू धुरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बापू धुरी हे आ. रवींद्र फाटक यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत.