*कोकण Express*
*जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले स्वागत..*
*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-*
जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनीष दळवी यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आज त्यांचे स्वागत करण्यात आले.मनीष दळवी यांची आकाशवाणीवर “मन की बात” या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना पुषपगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,उपाध्यक्ष समील जळवी,जिल्हा सहसचिव कृष्णा सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात केले.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेच्या माध्यमातून अनेक नवनवीन योजना आणून जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून झटत आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात दिलेले योगदान व अध्यक्ष मनीष दळवी यांचे ग्रामीण विकासासाठी चालू असलेले प्रयत्न याची दखल केंद्रस्तरावर ही घेण्यात आली आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना या कार्यक्रमात विशेष निमंत्रीत केले होते याचं कारणास्तव आज गुरुवारी ४ मे.रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्गनगरी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.